मुंबईपासून ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.
कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते.
या देवस्थानाचा उल्लेख ३४०० वर्षांपासून आढळतो. पुळे या लहान खेड्यात बाळंभटजी भिडे रहायला आले.ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला – भक्तांची कामनापूर्ती करण्यासाठी मी गणेशगुळे (पावस जवळील ) येथून या पवित्र क्षेत्री दोन गंडस्थळे व दंतयुक्त असे रूप धारण करून या डोंगरात आलो आहे. तू माझी पूजा – अर्चा – उपासना कर, तुझ्या गावावरील सर्व संकटे दूर होतील. माझे निरंकार स्वरूप याच कैवल्याच्या बनात म्हणजे डोंगरात आहे.
त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, दृष्टांताप्रमाणे भिडे गुरुजी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. दरम्यान – डोंगराच्या पायथ्यावर, समुद्राच्या काठावरील केवढ्याच्या वनात एक गाय फिरत असताना एका ठिकाणी उभी राहिली आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा झरू लागल्या, त्या धारा गाईच्या पायांजवळ असलेल्या लहान शिळेवर पडत होत्या. ती गाय भिडे यांचीच होती. गुराख्याने हे पाहिले आणि भिडे यांना सांगितले. सर्वांना आश्चर्य वाटले कारण ती गाय भाकड होती; दूध देत नव्हती !त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली. लोकांनी त्या शिलाखण्डाची पूजा केली, शेंदूर चर्चीत केला तेच ठिकाण आजचे गणपतीपुळे!
गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.
त्याच वेळी पावसजवळील गणेशगुळे मंदिरातील पाण्याचा झरा बंद झाला म्हणून ‘गुळ्याचा गणपती पुळ्यास आला’. अशी म्हण प्रचलित झाली. भिडे यांनी तिथे डोंगराच्या पायथ्याशी मंदिर बांधून पूजा सुरू केली. मंदिराच्या मागील टेकडीचा रस्ता मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. टेकडीला फेरा मारला कि भक्त पुन्हा मंदिरात पोहचतो.
असे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणेशाचे दर्शन घेतले होते. मंदिराची धर्मशाळा आणि नंदादीप श्रीमंत रमाबाई पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे. मंदिराबाहेर ११ दीपमाळा असून कार्तिक पौर्णिमेला गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट येथील गणेशमूर्तीवर पडतात.
श्री क्षेत्र गणपतीपुळे म्हणजे धार्मिकतेला पर्यटनाची जोड लाभलेले क्षेत्र. पाठीशी हिरव्यागार डोंगराची भक्कम साथ तर पुढय़ात अफाट निळा अरबी समुद्र. निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून किनाऱ्याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे. मंदिर डोंगराच्या एका बाजूला असल्याने गणपतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. साधारण दीड किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
गणपतीपुळ्याचे जुने मंदिर
गणपती मंदिरावरील सुंदर मूर्त्या
****
मंदिरात सद्या खिचडी आणि लाडू (गोड) म्हणून महाप्रसाद कोणतेही शुल्क न घेता दिला जातो.
गणपतीपुळे गावात सध्या प्रवेश करण्यापुर्वी प्रति व्यक्ती १०/- ( दहा रुपये) प्रवेश फि द्यावी लागते.
***
मंदिरासमोरच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा आहे. पण हा समुद्र जलक्रीडेसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. आतापर्यंत कितीतरी पर्यटकांना त्याने गिळंकृत केलेले आहे. कृपया या बीचवर गेल्यास खोल पाण्यात उतरू नका. ज्यांना पोहता येत नाही, त्यांनी विशेष काळजी घ्या. मंदिर प्रशासनाने अशा घटना घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. शासनाने लाईफ गार्ड नेमलेले आहेत तरी देखील आपण स्वतःच आपली काळजी घ्यावी.
गणपतीपुळ्याच्या मंदिरातील मुषकाची पितळी मुर्ती
****
पॅरासेलिंग प्रकल्प
गणपतीपुळे येथील हॉटेल
- रूम चे रेट -५० रु पासून ५०० पर्यंत आहेत
- २ नाष्टा मध्ये पोहे आणि उपमा २० रु,
- चहा ५ रु, कॉफी १० रु,
- आणि जेवण फक्त ६० रु तेही अनलिमिटेड .
भक्त निवास संपर्क - (०२३५७)२३५७५४/२३५७५५
गणपतीपुळे येथे इतर हॉटेल
- लँडमार्क रिसॉर्ट (02357 - 235284 किंवा मुंबई बुकींग : 022-26354124)
- शिवसागर पॅलेस (02357 - 235070 / 235726)
- अभिषेक बीच रिसॉर्ट (02357- 235214/235327)
- हॉटेल कृष्णा सी व्ह्यु (02357 - 235647)
- हॉटेल श्री सागर (02357-235345, 235145)
- हॉटेल दुर्वांकुर (02357 - 235764)
- अर्नव बीच रिसॉर्ट (091 - 9422508503)
- ट्रँक्वीलिटी बीच रिसॉर्ट (02357-235750)
- हॉटेल सिध्दी- श्री. महेश केदार (02357) 235599/ 9422631199
- सौजन्य: स्वप्नील जिरगे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा