राजगड - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड (भाग - 2)

गाईड आकाश आपले काम चोखपणे करत होता. मंदिरातील ओलसरपणा कमी करून तो जमिनीवर अंथरण्यासाठी प्लास्टिक शीट घेऊन आला, तोपर्यंत राजगडावरील वरच्या बाजूस असणाऱ्या एका गावातून २ धनगर मंदिरातील दोन कोपरे अडवून बसले, हे धनगर राजगडावरील येणाऱ्या पाहुण्यांना चहा, कांदा पोहे,  पिटले भाकरी बनवून देत. दर शनिवार व रविवार या धनगरांचा  नेहमीचा धंदा. एकाचे नाव होते लक्ष्मण तर दुसरा गणेश. शरीरयष्टी अगदी किरकोळ, पण काटकपणा अंगात ठासून भरलेला, भारदस्त आवाज. सहज शिक्षण विचारले, अर्थातच शिक्षण शून्य होते. दोघेही सख्खे भाऊ, लग्न झालेले, दोघांना ४-४ मुले, मात्र दोघांच्या चुली वेगळ्या. सुसंस्कृत समाजाची कीड इथेही लागलेली... असो.. आपला विषय वेगळा आहे. बाहेर धुके, पाऊस जोर धरत होता. निसर्गप्रेमेंची संख्या वाढत होती. धनगर लक्ष्मण व गणेश, बोला चहा.. कांदा पोहे... गरम गरम पिटले भाकरी..बोला .... असे ओरडत आपला धंदा करण्यात व्यस्त झाले.










दुपारचे २ वाजून गेले होते. भूक लागली होती. सु सु ला जोरात लागली होती, या थंडीत बाहेर तरी कसे जायचे. दात वाजत वाजत परेश म्हणाला.. च्यायला... नक्की सु सु ला होईल कि बर्फाचे तुकडे पडतील. सौरभ मला मागून मिठी मारून हसत होता. अजिंक्य व ब्रह्म काका अंगावर चादर घेऊन पडून होते. एवढ्यात आमचे कर्नल, मामा व पी.एस. काकांची एन्ट्री झाली. जेवायची वेळ झाली होती. बरोबर २.४५ वाजता पालेखुर्द गावातून  आम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आले. ३० भाकऱ्या, २ किलो तांदळाचा भात,  पिटले, वांग - बटाटा भाजी. मनोसोक्त जेवलो. आता ४ वाजले होते. बाहेर वातावरून खूपच सुंदर झाले होते, पपू काका मंदिराबाहेर आले, प्रेमाने शिव्या घातल्या...####...#####.. बाहेर या!.. बघा किती सुंदर निसर्ग आहे.. त्यांचे इंग्रजी सुरु होण्याअगोदर आम्ही सर्व लगबगीने मंदिराबाहेर आलो... खरचं निसर्गाचे रूप पाहून थक्क झालो. पाऊस थोडा शांत होता, पण जोराचा वाहणारा  वारा आम्हाला गारठून टाकत होता. पपू काका सर्वात जास्त या अनुभवाचा आनंद लुटत होते. .....परत फोटोसेशन सुरु केले.





आता ५ वाजून गेले होते. वर ढगात कडकडात सुरु झाला, पाऊस आला. मंदिरात परत चेक इन केले. आय ग..  मंदिरात खूपच ओलसरपणा जाणवत होता. शेकोटी पेटवून उब घेणे गरजेचे झाले होते. अशा वातावरणात सुकी लाकडे तरी कुठून आणायची! ...तेव्हा मामा म्हणाले,  राजवाडा जवळील एका खोलीत काही लाकडाचे तुकडे पहिले होते. बस... मग काय. मी, परेश, सचिन, आकाश, पपू काका, मामा लाकडे आणायला निघालो. सोबत मामांनी कोयता घेतला. त्या खोलीत प्रवेश केला, हि खोली पूर्वी दारू गोळा ठेवण्याची जागा होती, असे सचिनने सांगितले. आतमध्ये पत्रे, लाकडाचे मोठे मोठे ओंडके व खूप कचरा साठला होता. तिथे एक छोटा धनगर मुलगा (अंकुश) आपल्या छोट्या भावाबरोबर निसर्गप्रेमींना जेवण बनवून द्यायला सज्ज झाले होता. आम्ही आडोश्यात पडलेल्या लाकडाचे तुकडे जमविले.. परत मंदिरात आलो. लाकडाचे तुकडे धनगर लक्ष्मणला दिले. त्याचा भाऊ गणेश याने कुठूनतरी एक पत्र्याचा तुकडा आणला. आपल्या जवळील कोळशाचे तुकडे त्या पत्र्यावर अंथरले, वरून आम्ही आणलेल्या लाकडांना रचले, थोडेसे रॉकेल टाकून शेकोटी केली. वातावरणातील ओलसर हवेमुळे लाकूड जळताना खूपच धूर झाला. प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरले, मी तसाच कानटोपरे तोंडावर घेऊन बसून राहिलो.











धुराने जरी आमचे डोळे झोंबत होते, तरी मंदिरातील ओलसरपणा कमी होत होता. बरेच हायसे वाटत होते. धुरात डोळे बंद असतानाच झोपेचा चुटका काढून घेतला.

संध्याकाळचे ६.३० वाजले होते, लक्ष्मणला कोरा चहा बनविण्यास सांगितले. बाहेर वातावरून अजून गडद होत चालले होते. चहा घेतला, परत शेकोटी जवळ गोल करून बसलो. आतापर्यंत धनगर लक्ष्मणशी चांगलीच दोस्ती झाली होती. तो त्याच्या अनुभवाचे किस्से सांगत होता. शिक्षण काहीही नसतानाही इंग्रजीचे काही शब्द न चुकता बोलत होता. राजगडावरील साजरे होणारे कार्यक्रमाची माहिती देत होता. राजगड ते रायगड तो १० वेळा पर्यटकांना सुखरूप घेऊन गेला होता. दीड दिवसाचा हा लांबलचक प्रवासाचे थरारक वर्णन आम्ही शांत बसून ऐकत होतो. आवाजात चढ उतार होता, शब्दात वजन होत,  मधीच आम्हाला उपदेशाचे डोस पाजत होता, अगदी मोकळेपणाने तो आमच्यात मिसळला होता. आर्थिक दारिद्र्य पाचवीलाच पुजलेले असले तरीही, पैशाची कोणतीही लालसा त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसत नव्हती.



अंधाराचे साम्राज्य वाढत होते, पावसाने चांगलाच जोर धरला होता. मंदिरात लक्ष्मणने कल्पकतेने  मेणबत्ती भिंतीला चीटकवली. पपु काकांनी अमेरिकेहून आणलेली मेणबत्ती मंदिराच्या वर टांगली. भगवान शंकराच्या पिंडी जवळ दिवा होताच. आता पुरेसा प्रकाश मंदिरात होता. रात्रीचे ९.३० वाजले होते.  सौरभ, आकाश व अजिंक्य या तिघांना भूख लागली होती. पपू काकांनी सर्वांना जेवण उरकण्यास सांगितले. दुपारचे पिटले खूपच पातळ होते, लक्ष्मणला पुन्हा घट्ट पिटले, मिरची टाकून झणझणीत बनवायला परेशने सांगितले. गरम गरम पिटले, तांदळाची भाकरी, भातावर सर्वजण तुटून पडले.  लक्ष्मण व गणेश सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बसले. जेवण छानच झाले होते.







आता पर्यंत रात्रीचे १०.४५ वाजले होते. मला सु सु ला झाले होते, मी बाहेर जाणार, इतक्यात पपू काका म्हणाले किरण, मी पण येतो!.. मी मंदिराचा दरवाजा उघडला ... जबरदस्त  वारा अंगावर आला, मी परत आत आलो. पपू काका म्हणाले.. अरे चल .. मी आहे.. मी स्वत:ला तयार केले. काकांनी बेट्री व छत्री घेतली. कसाबसा त्यांच्या मागे चालत होतो. सु सु ला दूर जाणे परवडण्यासारखे नव्हते, मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस काकांनी बेट्री व छत्री माझ्या हातात दिली, त्यांनी उरकले मग मीहि उरकले, जीव मुठीत धरून परत मंदिरात जाऊन दार बंद केले. आमच्या दोघानंतर सौरभ ४ वेळा सु सु ला गेला होता, बाहेरून आत आला कि पहिला माझ्या कुशीत मिठी मारून दात वाजवत हसत राहायचा. लक्ष्मणने आम्हाला अंथरूण पांघरण्यास मदत केली. पपू काकांनी सकाळी ७ वाजता उठून, पटापट बेग घेऊन गडाचा उतरणीचा रस्ता धरायचा ठरवले. आम्ही सर्वांनी एकमताने मान्य करून अंथरुणावर आडवे झालो.







लक्ष्मणाने भिंतीवर लावलेली मेणबत्ती बोटाच्या चिमटीत धरून विजवली. आता मंदिरात अमेरिकेन दिवा व देवाचा दिवाच होता. बर्यापैकी प्रकाश होता. मंदिराच्या पत्र्यावर पाऊस आदळत होता. मंदिरात शांतात झाली. अचानक सौरभ ओरडला. दादा, उंदीर! दादा उंदीर!... मी आणि आकाश उठून बसलो. कुठे आहे... तो बघ, भगवान शंकराच्या पिंडीवरील पाणी जाण्यासाठी एका होल मध्ये मोठा उंदीर बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता.  मी म्हणालो, अरे बाबा एखादा वाघ आला असता तरी चालला असता, उंदीर नको. आकाशने माझ्याकडे पहिले, आणि म्हणाला.. दादा बरोबर आहे, 'खरच वाघ चालला असता', मी सुद्धा खूप घाबरतो उंदराला. सौरभने बिसलेरीच्या रिकाम्या बोतल त्या होल मध्ये चेपून चेपून भरल्या. आम्ही आडवे झालो, आकाश म्हणाला, दादा  मी खूप घाबरतो रे.. उंदराला.. मला एकदा चावला होता.. तेव्हापासून मी घाबरतो!. मी त्याच्याकडे पहिले, व म्हणालो "मला दोनदा चावला होता". आकाश गप्पच झाला, केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहतच राहिला.  कसेतरी, दोघांना समजावत तिघेही आडवे झालो. पावसाचा वेग रात्री भयंकर वाढत होता. सकाळी कसे निघायचे याचा सर्वजण विचार करत करत शेवटी झोपलो एकदाचे!

सकाळी ७.३० वाजले. पपू काकांचा आवाज कानी पडला, मी जागा झालो. बाहेर पाऊस मंदावला होता, पण वारा मात्र जोरात होता. सचिन, परेश व ब्रह्म काका जागे झाले. पपू काकांनी पटापट बेग भरून तयार होण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न करता आम्ही मावळे उठून उभे राहिलो. परेशने चहा बनविण्यास लक्ष्मणाला सांगितले. चहा घेतला, लक्ष्मणच्या सेवेचे मानधन दिले. देवाच्या पाया पडून बाहेर पडलो. शुजमध्ये साचलेले पाणी बाहेर काढले, शुज घातले, चालू लागलो. राजवाड्या जवळ छोटा धनगर अंकुश आमची वाट पाहत उभा होता. त्याने दिलेल्या कांदा भजीचे पैसे बाकी होते, पैसे देऊन त्याचा निरोप घेतला. पाऊस ओसरला होता. धुक मात्र खूप होते, पटापट रस्ता कापत होतो, गडाच्या पायऱ्या उतरलो. आता मात्र पायवाटेने चालणे थोडे आव्हानत्मक होते. ब्रम्ह काका व मामानी जवळच असलेली वनवेलीतून सर्वाना  काठ्या तयार केल्या, प्रत्येकाने काठी घेऊन, गड उतरणे सुरु केले.

बरोबर १ तासाने आम्ही गडाच्या पायथ्याशी माळरानात पोहचलो. जवळच एक धबधबा होता, ब्रम्ह काका, सौरभ व आकाशने त्या बर्फाच्या पाण्यात जाऊन बसले, बाकी आम्ही पाण्याने हात पाय व तोंड धुतले. परत फोटो सेशन सुरु झाले.















पालेखुर्द गावात जाऊन गरम गरम कांदा पोहे खाल्ले.  सर्व अनुभवाचा कित्ता रंगवीत, फ्रेश कपडे घातले. तोपर्यंत मुंबईला जाण्यासाठी गाडीचा बंदोबस्त झाला होता. हा थरारक अनुभव मनात साठवून घरी परतलो. सुखरूप!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा